Breaking
ब्रेकिंग

संजीवनीच्या पाकिटावर प्रेम करणाऱ्यांची निष्ठा कशावर? हाजीमेहमूद सय्यद

0 0 1 1 1 8

संजीवनीच्या पाकिटावर प्रेम करणाऱ्यांची निष्ठा कशावर? हाजीमेहमूद सय्यद
– शिवसेना पक्ष अडचणीत आहे अशा परिस्थितीत कोपरगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी सच्चा शिवसैनिकांनी देखील मातोश्रीशी इमान राखत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आजही खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे त्या सच्चा शिवसैनिकांबाबत आमदार आशुतोष काळे यांनी अंतकरणापासून दाखविलेली सहानुभूती आहे. मात्र ज्यांना शिवसेनेशी व मातोश्रीशी काही देणं घेणं नाही त्यांना आमदार आशुतोष काळे यांनी दाखविलेल्या सहानुभूतीवर बोलण्याचा अधिकार अजिबात नाही. तुम्ही संजिवनीच्या पाकिटावर प्रेम करणारे, तुमच्या नावची प्रेस नोट सुद्धा भाजपच्या कार्यालयातून येते. तुम्ही कोल्हे सैनिक आहात तुम्हाला काय कळणार पक्ष निष्ठा अशी टीका माजी नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, शिवसेना पक्ष अडचणीत आहे. शिवसेना प्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शिवसेनेच्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेसह अनेक राजकीय पक्षांना देखील शिवसेनेबाबत अमाप सहानुभूती निर्माण झाली आहे. मात्र जे शिवसेना आणि मातोश्रीशी प्रामाणिक नाहीत अशा लबाडांना मात्र या सहानुभूतीमध्ये देखील राजकारण दिसत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. मात्र यामध्ये त्यांची काहीच चुकी नसून आजवर त्यांनी शिवसेनेपेक्षा संजिवनीच्या पाकिटाला जास्त महत्व दिले आहे.त्यामुळे त्यांना खरी शिवसेना आजपर्यंत कधी समजलीच नाही व यापुढे देखील समजणार नाही. त्यांनी आमदार आशुतोष काळे यांनी दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल न बोललेलेच बरे असे माजी नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी म्हटले आहे
ज्या भाजपने शिवसेनेला संपविण्यासाठी षडयंत्र रचले. शिवसेनेत उभी फूट पाडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना त्रास दिला.राज्यात शिव सेना,हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे नाव राजकारणाच्या पटलावरून मिटविण्यासाठी ज्या पक्षाने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला पायदळी तुडविले. त्या भाजपच्या वळचटीला जावून बसनाऱ्या तुमच्या सारख्या संधी साधुंना खरी शिवसेना समजली नाही कारण तुम्ही कोल्हे सैनिक असून पाकीट वाले आहात. तुम्हाला एकनिष्ठ काय असते हे माहीत नाही. तुमची निष्ठा शिवसेनेवर नसून पाकिटावर आहे.त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी ज्या एकनिष्ठ शिवसैनिकांबाबतअभिमान असल्याचे वक्तव्य केले ते निष्ठावान तुम्ही नाहीत.तुमची निष्ठा शिवसेनेवर नाही तुमची निष्ठा संजिवनीवरून मिळणाऱ्या पाकिटावर आहे. आ.आशुतोष काळे यांनी बाळगलेला अभिमान हा त्या शिवसैनिकांबाबत जे आजही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहेत.तुमच्या सारख्या पाकिटावर निष्ठा असणाऱ्या कोल्हे सैनिकांसाठी नाही.तुम्ही शिवसेनेसोबत आहात का? याबाबत मोठा संभ्रम असून त्यामुळे तुम्ही कुठे आहेत हे अजूनही कोपरगाव मधील सच्चा शिवसैनिकांना समजले नाही. ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार पडले त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले त्यावेळी ज्या भाजपने कोपरगाव शहरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी जातीने हजर राहून आनंद व्यक्त करीत होता.यावरून तुमची कोल्हे निष्ठा समजून आले.त्यामुळे तुम्ही शिवसैनिक नाही. तुमची शिवसेनेवर आणि ठाकरे परिवारावर निष्ठा नाही. तुम्ही फक्त आणि फक्त कोल्हे सैनिक आहात.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी ज्या एकनिष्ठ शिवसैनिकांचा अभिमान बाळगला त्यावर बोलण्याचा तुमच्या सारख्या फितुरांना अधिकार नाही अशा स्पष्ट आणि मोजक्याच शब्दात माजी नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी कोल्हे सैनिकांवर टीका केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे