कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कर्मचाऱ्यांना १९% बोनस देणार- आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना साखर कामगार युनियनचे पदाधिकारी.
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कर्मचाऱ्यांना १९% बोनस देणार- आ. आशुतोष काळे
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ७ कोटी व बोनसचे ५.५० कोटी मिळून १२.५० कोटी येणार बाजारात
कोपरगाव प्रतिनिधी – जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या तुलनेत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गळीतास आलेल्या ऊसाला जिल्ह्यात सर्वाधिक २६५० रुपये भाव दर देवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असून कर्मचाऱ्यांची देखील दिवाळी गोड करतांना कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच १९% बोनस देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे
. त्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या बाजारपेठेत जवळपास १२.५० कोटी रक्कम येणार आहे. त्याबद्दल साखर कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मागील वर्षी गळीतास आलेल्या ऊसाला जिल्ह्यात सर्वाधिक २६५० रुपये उंचांकी भाव देवून शेवटचा हफ्ता प्र.मे.टन ५० रुपये दराची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. तसेच २०१०-११ मध्ये कपात केलेली पूर्व हंगामी प्रती. मे.टन ५० रुपये ठेव व त्यावरील व्याज शेतकऱ्यांना अदा केले आहे. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेवटच्या हफ्त्याचे ४ कोटी, कपात केलेल्या २०१०-११ चे ३ कोटी व कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या १९ % बोनसची एकूण रक्कम ५.५० कोटी असे एकूण १२.५० कोटी तसेच इतरही सलग्न संस्थांच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा बोनस यातून दिवाळीत जवळपास १५ कोटीच्या आसपास रक्कम कोपरगाव तालुक्याच्या बाजारपेठेत येणार आहे. त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करून रोख स्वरुपात रक्कम दिली आहे व कर्मचाऱ्यांना बोनसचे देखील लवकरच वाटप सुरु होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.